Wednesday 10 August 2022

प्रवास मेहनतीचा... आव्हानांचा... यशाचा... आनंदाचा... !

लाडकी लेक मृण्मयी ! मेहनती, सृजनशील, एकाच वेळेस अनेक गोष्टी करण्यासाठी धडपडणारी, उत्साही जोडीला हट्टी, मनाप्रमाणे करणारी, स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी. कथक विषयासाठी कोणतीही तडजोड म्हणजे अगदी घरचं लग्न सोडणारीही. कथक विशारद पूर्ण झाली. काल तिचा गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचा निकाल कळला आणि ती प्रथम श्रेणीत कथक विशारद पूर्ण झाली. अनेकांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आम्हाला मात्र तिचा तो प्रवास डोळ्यासमोर दिसतोय. 

यशाचा आनंद तर आहेच पण हा प्रवास तितका सहज घडलेला नाही. तिच्या यशाच्या सर्वात मोठ्या हक्कदार सर्व काही करून घेणाऱ्या तिच्या गुरु डॉ. अपर्णा भट-कासार आहेत. त्यानंतर ती स्वतः आणि तिची आई आहे. माझाही वाटा आहेच मात्र फारच मर्यादीत. कथक विषयाची कुठलीही


कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना तिने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. सुरवातीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होतांना कुठलाही ताण न येता नव्या नवलाईने सर्वांनाच सोप्प गेलं. हळूहळू साधना / सराव काय असतो ते कळायला लागलं. शाळा, ट्युशन याचा मेळ घालणे कठीण होऊ लागलं. वेळेची कसरत करतांना सर्वांनाच अडचणी येऊ लागल्या. काळावर सोडल्यावर मार्ग निघाला, काही वेळेस बोलणंही खाल्लीत. दहावीत तर फारच तारांबळ उडत होती. भंबेरी काय म्हणतात ते. शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत माझे मत सांगत असे. हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. "तडजोड' हा विषय तिच्या गुरुंजवळ अपवादात्मकच चालला. 

कुठलाही क्लास मिस झाला तर बोलणे ठरलेले. त्यातही कथक मध्ये तासनतास करावी लागणारी मेहनत, त्यात चूक झाली तर ऐकावे लागणारे कठोर बोल या सर्व गोष्टी डोळ्यासमोर आहेत. प्रचंड  थकवा आणि पुन्हा सकाळी उठल्यावर सुरु... त्याचाच परिपाक आज आनंदात झालेला दिसतो. गुरु-शिष्य नात्यात आम्ही दोघे कधी फारसे पडलो नाही कारण  प्रश्न आणि उत्तरे दोघेही अपर्णा दीदींकडेच मिळणार हे माहिती असे. मृण्मयीच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल जाणीव करून देत असत. तुम्ही गुरूंवर विश्वास ठेवला कि खूप गोष्टी साध्य होतात मात्र त्यात हस्तक्षेप केला कि उद्देशापासून दूर जाणे आलेच. समोरच्याच्या भूमिकेत गेलं कि प्रश्न सुटले म्हणून समजा. अनेक विद्यार्थी व पालक अभ्यास का कथक यात प्राधान्यक्रम ठरवितांना गडबडतात आणि तेथेच अशा प्रकारच्या परीक्षांमधील प्रवास थांबतो. मुलांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करुन त्याला निर्णय घेण्यासाठी साहाय्यभूत होऊन कायम सोबत असणं महत्वाचं. वर्षभरातून एकदा होणारा जाहीर कार्यक्रम खूप छान व्हायचा मात्र त्यासाठी संबंधित सर्वांची मेहनत याला तोड नाही. 

या प्रवासात वर्षभरात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील सहभाग कथकसाठी अतिरिक्त वेळ

देणारा असे. कधीतरी अतिरिक्त ज्ञान, माहिती मिळविण्यासाठी बाहेरगावी जाण्याची संधी घेतल्याने त्या क्षेत्रातील प्रगल्भता येते. डॉ. अपर्णा दीदी यासाठी विशेष प्रयत्न करतात. दीदींचे या क्षेत्रासाठीचे समर्पण प्रेरणादायी आणि त्यामुळेच इतक्या साऱ्या शिष्या विशारद होऊ शकल्या. यावर्षीही ४ मुली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विशारद झाल्या. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मिळणारे यश ज्याप्रमाणे अनमोल तर असतेच पण तो प्रवास थक्क करणारा व म्हणून प्रेरणादायी ठरतो. तसेच काहीसे मृण्मयीच्या कथक विशारद प्रवासाबाबत म्हणता येईल. मृण्मयीने तटस्थपणे या प्रवासाकडे पहावे. तात्कालिक परिस्थितीत प्रत्येकाने मांडलेले विचार तपासावे. तिचे हे यश सर्वांच्या एकत्रित परिणामांचाच परिपाक असल्याचे लक्षात येईल. तिच्या गुरुंबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतांना मृण्मयीचे व तिच्या आईचे सौ अदितीचे विशेष  अभिनंदन ! मृण्मयी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कथक विषयात एमएचे शिक्षण घेत आहे. तेथेही तिला शमाताई भाटेंसारख्या गुरु लाभल्या आहेत. तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ! 

9 comments:

  1. खुप छान, अभिनंदन!आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Mrnmai great best achievement congrates

    ReplyDelete
  3. अभिनंदन
    अभिनंदन
    अभिनंदन

    त्रिवार अभिनंदन

    ReplyDelete
  4. उत्कृष्ट लेख !
    मृण्मयी चे उत्तम यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
    सौ. आदिती व गिरीशचे हार्दिक अभिनंदन !!!

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
  5. मृण्मयी चे हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  6. कु. मृण्मयी चे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मृण्मयीची मेहनत आणी गिरीशराव तुम्ही आणि सौ. वाहिनीनीं तिला दिलेला पाठिंबा त्या मुळे हे शक्य झाले, तुम्हां दोघांचे देखील अभिनंदन.

    ReplyDelete
  7. मृण्मयी चे हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  8. खुपच छान.. विशिष्ट कला क्षेत्रात यश संपादित केल्याबद्दल कु.मृण्मयीचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

    ReplyDelete
  9. 🌹मंगलमय हार्दिक शुभेच्छा ! अभिनंदन !! अभिष्टचिंतन !!!. 💐

    ReplyDelete