Tuesday 23 June 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १५

डॉ. निलेश व डॉ. सौ. पल्लवी पाटील यांची यशोगाथा... 

नैसर्गिक जीवनशैली व भारतीय संस्कृती हेच कोरोनाला उत्तर ! 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील एक महत्वाचा विषय आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे. आजचा हा भाग "कोरोना" सारख्या आजारांना आज आणि भविष्यातही सामोरे जाण्याच्या अनुषंगाने लिहीत आहे. एका मोठ्या विश्रांतीनंतर लिहीत आहे कारण भडगाव येथील डॉ. निलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील या दाम्पत्याने चार कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचे औषधोपचार न करता बरे केले आहे. त्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे नैसर्गिक जीवनशैली जी आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितली आहे. या डॉक्टर दाम्पत्याचे, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचे व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचे मनापासून अभिनंदन करतो. डॉ. निलेश पाटील यांचेशी वैयक्तिक बोलून त्यांच्याशी झालेला संवाद लेख स्वरुपात मांडत आहे. हा लेख वाचणाऱ्या सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते आपण नैसर्गिक जीवनशैलीचा स्विकार करावा व आनंदी जीवनाचा लाभ घ्यावा.

सर्वात महत्वाचे डॉ. निलेश पाटील यांना "कोरोना" असा आजार आहे हे मान्य नाही, त्यावर विश्वासही नाही. निसर्गात असलेल्या अनेक विषाणूंसारखा हा एक विषाणू आहे त्याला घाबरुन जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. मग जगभरात होणारे मृत्यू कसले ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. डॉ. पाटील यांचे म्हणणे आहे हे मृत्यू एक तर त्यांनी घेतलेल्या धास्तीने वा भीतीने अधिक आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या आजारानेही होत असेल त्याचे प्रमुख कारण आजार असते ना कि कोरोना. कोरोना हा विषयच नाही असे डॉ. पाटील ठामपणे सांगतात. हा एक मानसिक खेळ आहे. कोरोनाबाबत माणसांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कोरोना आहे आणि कोरोना नाही. जे म्हणतात कोरोना नाही त्यांना भीती वा अडचण नाही आणि जे म्हणतात आहे, त्यांच्या मनावर त्याचा नकारात्मक परिणाम अधिक असतो. ते त्याचा बाऊ करतात. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली कि, बहुतांश रुग्ण केवळ भीतीमुळे त्याचे बळी ठरतात.

डॉक्टर साहेब व त्यांच्या पत्नी गेले अनेक दिवस कोरोना पॅझिटिव्ह रुग्णांमध्ये जात आहेत. तेथे सामान्य माणसासारखे त्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन असते. रुग्ण आणि ते यात वेगळे असे काही वाटले नाही. त्यामुळे रुग्णांना एक विश्वास आला आणि त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद देऊन बरे झाले आहे. सुरवातीला संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन चार रुग्णांवर कोणतेही औषधोपचार न करता त्यांना बरे करण्यात डॉक्टर दाम्पत्याला यश आले आहे. काय केले या दाम्पत्याने ? रोज सकाळी दोन तास योगासन, प्राणायाम व आपल्याला काही झालेलं नाही हा विश्वास देण्यासाठीचा संवाद तर सायंकाळी दोन तास विविध प्रकारचे खेळ... चार रुग्णांसह पाचोरा व भडगाव साठीच्या कोविड सेंटरमधील सर्व ५२ रुग्णांसाठी या थेरपीचा वापर केला. यासर्व गोष्टी या दाम्पत्याने त्यांच्यामध्ये जाऊन केल्यात. रूग्णांमध्ये याव्दारे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास झाला.  शिवाय त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी हे फायदेशीर ठरतांना दिसत आहे. रुग्णही योगा आणि विविध खेळात रमल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता वाढीस मदत झाली. एक आठवण सांगतांना ते एका पॉझिटिव्ह रुग्णाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेले पेढेही या दाम्पत्याने खाल्ले आणि तेथेच रुग्णांचा विश्वास वाढला कि आपल्याला काहीही झालेले नाही. 

मागील ५ वर्षात नैसर्गिक उपचार पद्धतीचे अभ्यासक्रम डॉ. पल्लवी पाटील यांनी केलेले आहेत. या सर्व उपचारांचा त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केला. गेल्या दोन महिन्यात त्यांनी शिजवलेले अन्न खाल्लेले नाही. आपल्या रुग्णांवर औषधोपचारापेक्षा या नैसर्गिक पद्धतीचा ते अवलंब करीत आहेत. डॉ. पाटील यांचे घरी त्यांचे ८० वर्षांचे वडील आहेत ते आजही प्रॅक्टिस करतात. त्यांची लहान मुलेही त्यांच्या सोबत योग करतात. कोविडच्या रुग्णांसाठीही आहारात त्यांनी नैसर्गिक आहाराचा अवलंब केला. यात विशेषत्वाने विविध फळांचा रस जसे मोसंबी, संत्री, आंबा, लिंबू व शहाळे (नारळाचे पाणी) यांचा वापर केला. यामुळे शरीरात विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठीची आवश्यक की जीवनसत्वे मिळाली आणि तीनच दिवसात रुग्ण कोरोना निगेटिव्ह झाले. इतर रुग्णही कोरोनमुक्त झाले यात ९४ वर्षांच्या आजींचाही समावेश होता. रुग्णांचे मनोबल वाढविणे, हा आजाराचं नाही अशी मानसिकता तयार करणे, आपण इतरांसारखेच आहेत असा विश्वास देण्यासाठी हे दाम्पत्य विशेष प्रयत्न करतात.

डॉ. पाटील अतिशय आत्मविश्वासाने सर्व गोष्टी सांगत होते. नैसर्गिक जीवनशैलीने मुक्त झालेले रुग्ण आम्हाला आयुष्यात कधीही विसरणार नाहीत असे ते अभिमानाने सांगतात. तसेच टीव्ही या माध्यमांपासून सर्वांनी दूर राहावे असे ते कळकळीने आवाहन करतात.. त्यामुळे माणसाची विचारशक्ती संपून जाते. त्याच त्याच बातम्या पाहून मनात "कोरोना" बाबत नकारात्मक भाव निर्माण होतो. आम्ह गेल्या ५ वर्षांपासून टीव्हीचं पाहत नाही असे ते अभिमानाने सांगतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्यांना त्याचा परिणाम जाणवतो असेही ते सांगतात. कोरोना सदृश विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढवावी, त्यासाठी योग्य तो नैसर्गिक आहार घ्यावा व आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असेही ते सांगतात. भारतीय संस्कृतीत नैसर्गिक जीवनशैलीला महत्व दिले आहे ते जाणूनच प्रत्येकाने सिद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले. 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४ 

15 comments:

  1. Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  2. Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  3. डॉक्टर निलेश व डॉक्टर पल्लवी पाटील यांनी केलेल्या प्रयोगाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार !!
    हा प्रयत्न करतांना त्यांनी खूपच मोठी जोखीम घेतली होती . त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल त्यांचे अभिनंदन . रुग्णांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही कौतुक .
    प्रयोग सतत व मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेंटेशनसहीत करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  4. Dr saheb & sau patil madam doghanche khup khup abhinandan

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  5. क्या बात है 👍
    खुपच छान माहीती आहे
    समाजातील चांगली बाजु समोर आणली

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  6. डॉक्टर साहेबाचे व मॅडम याचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ,आपण फळाची नावे सांगितले पण आहार विषयी माहिती सविस्तर दिली नाही, कृपया द्यावी

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद ! आहाराविषयी त्यांचेशी बोलायचे राहिले. बोलून कळवतो.

      Delete
  7. खुप छान माहिती मिळाली.या प्रतिकूल वातावरणाशी झगडण्याची दिशा मिळाली आणि ती इतरांपर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करू.डॉक्टरांचे खूप खूप अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद ! समाजात सकारात्मकता वाढावी यासाठीच लिहिले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू या !

      Delete
  8. आपले मास्क वापरणे, रुग्णांस/वस्तुंना स्पर्श करणे बाबतचे मत काय? टिव्ही बघत नाही तर जगाबाबत अपडेट कसे रहाता? शिजविलेले अन्न का खाऊ नये?

    ReplyDelete