Thursday 16 February 2023

वारी जागरणाची... भाग ३



ग्राम संवाद सायकल यात्रा ! 

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेतील काही घटनांचा आपण सविस्तरपणे आढावा घेत आहोत. आपण सर्व वाचक ते वाचत आहात याचा खरोखर आनंद आहे. माझे सर्व सहकारी सायकल यात्रींच्या आठवणी ताज्या होत आहेत, आठवणींबाबत बोलत आहेत, त्याला उजाळा देत आहे. मित्रांनो आजच्या तिसरा भाग हा कृतज्ञतेबाबत आहे. संस्थेची ग्राम संवाद सायकल यात्रा माझ्यासाठी प्रथम अनुभव होता. यापूर्वीच्या सायकल यात्रा वा पदयात्रा याबाबत जे ऐकले ते ऐकून एक दडपण मनावर नक्की होते मात्र मला पूर्ण विश्वास होता कि हि यात्राही तेव्हढीच चांगली होईल किंबहुना त्यापेक्षाही अधिक ! यात्रेत आणि यात्रेच्या समापनानंतर सर्व सहकाऱ्यांचे जे प्रतिसाद आहे ते सुखावह व आनंददायी आहेत अर्थात त्यासाठी पूर्व नियोजन कामी आले असे नक्की म्हणता येईल. त्याला जोड होती  आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी... 

यात्रा यशस्वी होण्यातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे मार्गावरील विविध संस्था व व्यक्ती ! भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व महात्मा गांधींचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी साहाय्यभूत ठरलेल्या सर्व शैक्षणिक संस्थाप्रती सर्वप्रथम मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे अगत्याचे ठरते. या सर्व संस्थांनी आपला वेळ, विद्यार्थी, शिक्षक, शाळा / महाविद्यालय, तेथील संसाधने उपलब्ध करून दिल्यामुळे हि यात्रा पूर्णत्वास येऊ शकली. या सर्व संस्था, व्यक्ती, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो. प्रत्येकाचेच सहकार्य मनापासून मिळाले त्यामुळे वैयक्तिक नाव घेणार नाही मात्र त्या सर्व दृश्य - अदृश्य , ज्ञात - अज्ञात हातांना विनम्र अभिवादन करतो आणि अपेक्षा करतो यासारख्या समाजोपयोगी उपक्रमांना आपण भविष्यातही असेच पाठबळ द्याल. या सर्व संस्थांची किमान नावे नमूद करणे माझे कर्तव्य आहे. 

एल. एच. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, वावडदा, स्वा. सै. पी. डी. थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद, उमरदे ग्रामपंचायत, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल, महेंद्रसिंह पाटील माध्यमिक विद्यालय, खडकेसीम, भारती विद्या मंदिर कासोदा, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, मंगरूळ, किसान आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारोळा, स्व. जिभाऊ सो वसंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव, माध्यमिक विद्यालय, तामसवाडी, माध्यमिक विद्यालय, शिंदी, स्व. सौ. बहिणाबाई धनाजी महाजन अनुदानित आश्रम शाळा, गुढे, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, मेहुणबारे, लोकनेते काकासाहेब जि. जि. चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, इच्छापूर (करगाव), आनंदीबाई बंकट मुलांचे विद्यालय, चाळीसगाव, शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालय, वाघळी, सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा, माध्यमिक विद्यालय, बाळद, गो. से. हायस्कुल, पाचोरा, कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा, शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल, श्रीमती पी. डी. बडोले माध्यमिक विद्यालय, वरखेडी, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, शेंदुर्णी, आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी, डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा व डॉ. निलेश सुभाषचंद (जय) ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय, विटनेर इ. संस्थांचा समावेश होता.  

ग्राम संवाद सायकल यात्रा काढायची जेव्हा निश्चित झाले तेव्हापासून ज्येष्ठ सहकारी उदय महाजन, प्रत्यक्ष सहभागी झालेले अब्दुलभाई, डॉ. अश्विन झाला, सहप्रमुख सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात यात्रेचे नियोजन केले. संस्थेच्या कार्यपद्धतीचा परिचय या निमित्ताने झाले. पूर्वीच्या यात्रांचा अनुभव यासाठी खूप कामी आला. अनेक बारकाव्यांवर काम केळ त्यामुळे वेळेवर फारशा अडचणी आल्या नाहीत. कपडे वाळत घालण्याच्या दोरीपासून, सायकलमध्ये हवा भरण्यासाठीचा पंप, जेवण तयार करण्यासाठी लागणारे भांडे, मीठ मिरची इ.चा बारकाईने विचार, संपूर्ण यात्रेत काहीही अडचण आली तर कोणावरही अवलंबून न राहता यात्रा यशस्वी होईल अशी हि तयारी होती. या सर्व महानुभावांचे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

सायकल यात्रेतील सहभागी सर्व यात्री, वाहन चालक धनराज पाटील, ढोलकी व संबळ वादक भिकाभाऊ पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सर्व सहकारी, उदघाटन सत्राचे प्रमुख पाहुणे  पोलीस अधीक्षक मा. एम. राजकुमार, समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय अण्णासाहेब डॉ. के. बी. पाटील, वैयक्ति पातळीवर तामसवाडी येथे भोजन व्यवस्था करणारे संजय खैरनार सर, बापू महाले, चाळीसगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी व डॉ. राहुल कुळकर्णी, वाघळी येथील भोजन व्यवस्था करणारे जि. प. माजी शिक्षण सभापती मा. पोपट तात्या भोळे, खासदार पत्नी संपदाताई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब सतीश पाटील, आ. मंगेश चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रदीपजी अहिरे, नगरदेवळा येथील शिवनारायण जाधव, दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे सचिव सतीश काशीद या सर्वांचे कृज्ञतापूर्वक मनापासून धन्यवाद !

या यात्रेमागील प्रेरणास्थान व प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ जैन यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. यात्रेची सुरुवात करतांना तयारी बद्दल आस्थेने केलेली चौकशी, यशस्वीतेसाठी दिलेले आशीर्वाद हि सर्वात जमेची बाजू होती. श्रद्ध्येय मोठ्या भाऊंनी समाजमनाचा संपादित केलेला विश्वास व दिलेला उत्तमतेचा वसा सर्व समस्यांचा रामबाण उपाय म्हणता येईल व तिचे यात्रेच्या यशस्वितेची गुरुकिल्लीही ! (क्रमशः) 

गिरीश कुळकर्णी

यात्रा समन्वयक 

ग्राम संवाद सायकल यात्रा 

No comments:

Post a Comment