Saturday 11 April 2020

श्री गणेशा !

श्री गणेशा !

बुद्धीची देवता श्री गणेश व विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या कृपाशिर्वादाने आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संवादाच्या या एका नव्या दालनाला सुरुवात करीत आहे. संवाद... या हृदयाचा त्या हृदयाशी ! यापुढे माझे काही विशेष लेखन आपणास गिरीश कुळकर्णी मदतीचा हात या ब्लॉगवर वाचावयास मिळतील. सोशल मिडीयावर लिहिलेले सर्वच इथे असणार नाही. अगदी निवडक, मला जे लिहून मनापासून आवडले,  भावले ते इथे खास आपल्यासाठी देणार आहे. आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आपण आवर्जून वाचून आपला प्रतिसाद नोंदवावा व प्रोत्साहित करावे. लिखाणातील निर्मिती हि बहुतांश वेळेस वाचकांच्या आवडीतून निर्मित होते असा माझा विश्वास आहे.

मित्रहो, खूप दिवसापासून आपला स्वतःचा ब्लॉग सुरु करावा अशी इच्छा होती. विविध वर्तमानपत्रे, मासिके व सोशल मीडियावरील लिखाण वाचल्यानंतर अनेक जण विचारात तुमचा ब्लॉग नाही का ? नाही असे म्हणतांना मन खट्टू व्हायचे मात्र त्यामुळे काही अडत नाही असा पूर्वग्रह असल्याने व त्यावेळी त्याचे फारसे महत्व वाटत नसल्याने तो तयार झाला नव्हता. सध्याच्या लोक डाऊनमध्ये अनेक गोष्टी केल्या पाहिजे असे ठरविले त्यातील एक म्हणजे प्रलंबित असलेले ब्लॉग तयार करण्याचे काम...आज सकाळी मित्रवर्य दिलीप तिवारींनी त्याला बळ देत आग्रहच धरला, आज हे काम नक्की करा असे सांगितले. माझ्या काही मित्रांचा आग्रह मोडता येत नाही त्यातील दिलीपराव !  आजपासून हि ब्लॉग सेवा सादर करतांना मनापासून आनंद होत आहे. किती सोपं काम आणि आपण किती दुर्लक्ष केला याची जाणीव झाली.

पुन्हा एकदा विनंती आपण येथे यावे, व्यक्त व्हावे, विषय सुचवावे आणि महत्वाचे आपणही आपला ब्लॉग तयार करुन त्यावर लिखाण सुरु करावे... मदतीचा हात कायम आपल्यासाठी ! 

14 comments:

  1. गिरीशराव अभिनंदन.आपला ब्लॉग नक्कीच वाचनिय होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. दिलीपराव धन्यवाद ! आपल्या शुभेच्छा नक्कीच महत्वाच्या ठरतील...

      Delete
  2. चिंतामणराव धन्यवाद ! आपले मार्गदर्शन लाभावे हीच अपेक्षा...

    ReplyDelete
  3. गिरीशराव,
    सस्नेह नमस्कार.
    आपण खूप छान उपक्रम सुरु केलेला आहे मी प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो...
    हा ब्लॉग आपल्यासाठी आणि वाचकांसाठी खूप महत्वाचा ठरेल यात तीळमात्र शंका नाही. आपल्या फिरस्तीमुळे आपल्याला जग अनुभवायला मिळाले आहे. आपले हे अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. आपल्या अनुभवाचे प्रतिबिंब या ब्लॉगमध्ये उमटणार आहे.
    आपल्या नव्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा देतो. लेखनात नाविन्यता, सातत्य आणि नियमितता आपण राखाल यात शंका नाही.
    गणपती बाप्पा आपल्या हृदयात आहेत वाचक म्हणून पुढच्या विषय आणि लेखनाची नेहमीच उत्सुकता असेल.
    किशोर कुळकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. किशोर आपल्यासारख्या सुहृदांच्या शुभेच्छा बळ देणाऱ्या आहेत. आपली अपेक्षा पूर्ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

      Delete
  4. गिरीश , तुझ्या नवीन उपक्रमास शुभेच्छा !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपले नाव समजले तर आनंद होईल.

      Delete
  5. अप्रतिम सर����

    ReplyDelete
  6. धन्यवाद गौरव... हि सुरुवात आहे. अप्रतिम करण्याचा प्रयत्न करेल.

    ReplyDelete
  7. अभिनंदन गिरीश,नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा !! 💐💐

    ReplyDelete
  8. - किशोर शिरुडे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद किशोर ! वेळोवेळी आपल्या सूचना, मत यांचे स्वागत आहे.

      Delete