Saturday 11 April 2020

कोरोना हद्दपार करण्यासाठी जनता सरकारसोबत


सध्या संपूर्ण जगात "कोरोना" या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला वैश्विक महामारी म्हणून जाहीर केले आहे. या आजाराची लस अजून निर्माण झालेली नसल्याने हा आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या देशाची सरकारे व प्रशासन आवश्यक ती पावले उचलत आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी  घराबाहेर पडू नये हा एकमेव सध्या उपाय आहे. मानवाला अशा प्रकारे अनेक दिवस घरात स्वतःला बंद करुन घेणे तसे कठीण असले तरी नाईलाज म्हणून त्यांनी ते स्वीकारलेले दिसते आहे. या गोष्टीचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. या मानसिक अस्वस्थतेवर उपाय शोधण्यासाठी भारताचे पंतप्रधान काही वेगवेगळ्या कृती करण्याचे आवाहन करीत आहेत. यापूर्वी या आजाराच्या लढाईत महत्वपूर्ण  भूमिका बजावणाऱ्या देशसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थाळी / घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर "कोरोना"च्या या लढाईत आपण एकटे नसून देशाची १३० कोटी जनता आपल्यासोबत आहे, हा विश्वास जागविण्यासाठी मागील रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी  नागरिकांनी घरातील वीज बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन केले होते.


पंतप्रधानांच्या या आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत असले तरी काही जणांना हा पंतप्रधानांच्या प्रतिमा उंचावण्याचा राजकीय स्टंट वाटतो, कार्यक्रम वाटतो. सोमवारी लगेच यादृष्टीने कोरोना बाबतीतील जनतेमधील जागृती व राष्ट्रीय आपत्तीत जनतेचे वर्तन अभ्यासण्याच्या दृष्टीने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १० प्रश्न विचारण्यात आले होते. 

हे सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील व विविध विचारसरणीच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा व्हाट्सअँपद्वारे  प्रयत्न करण्यात आला. केवळ एका दिवसाची मुदत दिलेल्या या सर्वेक्षणात ४५७ नागरिकांनी सर्वेक्षण फॉर्म भरुन दिला आहे. शेवटच्या दोन प्रश्नात एकापेक्षा अधिक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य हवे होते असे अनेकांनी बोलून दाखविले. या सर्वेक्षणातील प्रतिसादावर नागरिकांमध्ये "कोरोना" या विषयाबद्दल पुरेशी जागरुकता  दिसून आली असून या आजाराला हद्दपार करण्यासाठी जनता सरकारसोबत आहे. या राष्ट्रीय आपत्तीत  समाजाचे वर्तन अतिशय संतुलित असून त्यांना थाळी वाजणे वा दिवे लावणे अशा उपक्रमांची  आवश्यकता  वाटते. 

त्या सर्वेक्षणाची माहिती व काढलेले निष्कर्ष ...
  • दिवे लावण्याच्या उपक्रमात ९८%  नागरिकांनी सहभाग घेतला. 
  • पंतप्रधानांच्या आवाहनामुळे दिवे लावणाऱ्यांची संख्या केवळ 30 टक्के.  
  • कोरोनाच्या संकटाला सामोरे जातांना कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आम्ही सोबत आहोत यासारखे 
  • उपक्रम राबविले पाहिजे असे 95 टक्के लोकांना वाटते. 
  • दिवे लावणे उपक्रमात सहभागी झाल्याने भावनिक समाधान मिळ्णाऱ्यांची संख्या ९८ टक्के. 
  • दिवे लावणे हि सहेतुक व अध्यात्मिक कृती असल्याचे वाटणाऱ्यांची संख्या ९४ टक्के. 
  • कोरोनाबाबत ९८ टक्के नागरिक जागरुक असून योग्य ती काळजी घेतात.
  • कोरोना हटविण्यासाठी भारत सरकार अपेक्षित उपाययोजना करीत असल्याचे ९६ टक्के लोकांना वाटते. 
  • ज्यांनी थाळी वाजविण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला नव्हता अशा २६ पैकी १७ व्यक्तींनी दिवे लावण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. 
  • सरकारच्या सूचनांचे पालन करुन सहयोग देणाऱ्यांची संख्या ७६ टक्के आहे. 
  • लॉक डाऊन मधील वेळ कुटुंबासोबत घालविणाऱ्यांची संख्या ५० टक्के. 
  • दिवे लावणे सारखे उपक्रम राबविण्याची गरज न वाटणाऱ्या २१ पैकी १३ जणांनी दिवे लावले. त्यातील ७ जणांनी कार्यक्रम म्हणून तर ६ जणांनी आध्यात्मिक कृती म्हणून तसे केले. ८ व्यक्तींनी दिवे लावले नाही त्यातील ४ जणांना हि गोष्ट अंधश्रद्धा वाटते तर इतरांना राजकीय स्टंट वाटतो.

सर्वेक्षण फॉर्ममध्ये विचारण्यात आलेले प्रश्न, त्याला मिळालेली संख्यात्मक उत्तरे...

आपण रविवारी रात्री ९ वाजता दिवा / दिवे लावले का ? - ४४१ प्रतिसाद 
हो - ४३२ नाही - ९ 

आपण दिवे का लावले ? - ४३७ प्रतिसाद 
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद - १३१ 
माझे व इतरांचे मनोबल उंचावण्यासाठी - ९१ 
आम्ही सर्व सोबत आहोत यासाठी - २१५ 

"कोरोना" संकटाला सामोरे जाण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत का ? - ४४३ प्रतिसाद 
हो - ४२२ नाही - २१ 

दिवे लावल्यानंतर आपणास कसे वाटले ? - ४३६ प्रतिसाद 
समाधानी - १७२ , आनंदी - १४८ , खूप भावनिक - ११० , काहीही नाही - ६ 

दिवे लावणे हि कृती म्हणजे...४४० प्रतिसाद 
अंधश्रद्धा - ४ , सहेतुक कृती - २४४ , कार्यक्रम - २२ , अध्यात्मिक कृती - १७० 

"कोरोना" होऊ नये यासाठी मी १०० टक्के काळजी घेतो आहे का ? - ४४३ प्रतिसाद 
हो - ४३५ नाही - ० थोडीफार - ८ 

भारत सरकार कोरोनासाठी योग्य ती उपाययोजना करते आहे का ? - ४४० प्रतिसाद 
हो - ४२३ नाही - १७ 

यापूर्वीच्या थाळी / घंटी / शंख वाजविणे उपक्रमात आपण सहभागी झाला होतात का ? - ४४१ प्रतिसाद 
हो - ४१५ नाही - २६ 

"कोरोना" संदर्भात माझे योगदान कोणत्याप्रकारे आहे ? - ४४२ प्रतिसाद 
सरकारच्या सूचनांचे पालन - ३३६ , जनजागृती - ४६ , अन्नदान - १९ , आर्थिक मदत - २६ , अन्नधान्य मदत - १५ 

लॉक डाऊनमध्ये आपण विशेष काय करतात ? - ४३८ प्रतिसाद 
छंद जोपासणे - ६२ , अपूर्ण कामे पूर्ण करणे - ७९ , कुटुंबाला वेळ - २१७ , वाचन - ३८ , स्वतःसाठी वेळ - ४२ 


5 comments:

  1. प्रिय मित्र गिरीशराव ...

    कोरोना, पंतप्रधान व भारतीय माणूस यांचे प्रतिबिंब उमटवणारा आणि ठोस निष्कर्षाप्रत नेणारा सर्वे तुम्ही केलात. असा सर्वे करावा, हे भाजपला सूचले नसेल. PMO ला या सर्वेचा निष्कर्ष किमान हिःदी भाषेत लिहून मेल करा. मला खात्री आहे, त्याचा उल्लेख मोदी जनआवाहनात किंवा मन की बात मध्ये करतील. दिवे लावणी या विषयाचे वेगवेगळे पैलू समोर आले. तुम्ही उत्तम सर्वेक्षक आहात, हे पुन्हा सिद्ध झाले. जळगावमध्ये कचकड्याचे स्तंभ बनलेल्यांना शहाणपण शिकवणारे तुमचे कार्य आहे.

    अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. दिलीपराव धन्यवाद ! प्रयत्न करतो.

      Delete
  2. स्तुत्य प्रयत्न !

    ReplyDelete